बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल, छत्रपती संभाजीनगर सातव्या क्रमांकावर, मराठवाड्याचा टक्का घसरला !

Foto
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यंदा राज्याचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे दोन टक्क्यांनी घटला आहे. राज्यात एकूण १४ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. सर्व विभागीय मंडळातून ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर ८६.८० टक्के मुले उत्तीर्ण झाली.

राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले की, फेब्रुवारी-मार्चमध्ये एकूण १५३ विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून अधिकृत वेबसाईटवर आपला वैयक्तिक निकाल पाहता येणार आहे. यंदा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. राज्यातील सुमारे १४ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

यंदाही मुलींनी बाजी मारत ९३.१५ टक्के उत्तीर्णता मिळवली, तर मुलांचा निकाल ८६.८० टक्के लागला. गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालात सुमारे २ टक्क्यांची घट झाली आहे. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखा ९६.४४ टक्क्यांसह अव्वल ठरली. वाणिज्य शाखेचा निकाल ८७.०३ टक्के, तर कला शाखेचा निकाल ७८.०२ टक्के लागला आहे. विभागनिहाय निकालात कोकण विभाग ९४.१४ टक्क्यांसह प्रथम क्रमांकावर आहे, तर लातूर विभागाचा निकाल ८४.१४ टक्के असून तो सर्वात कमी आहे.

बारावीचा विभागनिहाय निकाल
१. कोकण ९४.१४ टक्के
२. पुणे ९१.२५ टक्के
३. अमरावती ९०.९२ टक्के
४. नाशिक ९०.७२ टक्के
५. मुंबई ९०.०८ टक्के 
६. कोल्हापूर ८९.९७ टक्के.
७. छत्रपती संभाजीनगर ८८.६८ टक्के
८. नागपूर ८८.६७ टक्के
९. लातूर ८४.१४ टक्के

राज्य मंडळामार्फत पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला जात आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेत १२ वीचा निकालाबाबत माहिती देत आहेत. त्रिगुण कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचा निकाल ८९.७९ टक्के निकाल लागला आहे, तर कोकण विभाग ९४.१४ टक्क्यांसह अव्वल आहेत. यावर्षी देखील निकाल घटला आहे, यावरती बोलताना कुलकर्णी म्हणाले, निकाल घटण्यामागे कारण मुख्यत्वेकरून मी मागचा निकाल कंपेर करतो त्यामागे कॉपीमुक्त अभियान चांगल्या प्रकारे राबवले गेले असे मला वाटते. गेल्या वर्षी एकाही कर्मचार्‍यावरती कारवाई झाली नव्हती, यावेळी १०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्यावर्षी ९१.८८ निकाल होता यावर्षी २.० टक्क्याने निकाल कमी झाला आहे.

त्रिगुण कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितले की, फेब्रुवारी मार्च बारावी परीक्षा १५३ विषयांचे परीक्षा घेण्यात आली. नऊ विभागीय मंडळातून राज्यात एकूण १४ लाख ५८ हजार एवढ्या मुलांनी परीक्षा दिली, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल ८९.७९ टक्के इतका लागला आहे. बारावीचा गेल्या वर्षीचा निकाल पाहिला असता  ९१.८८ टक्के लागला होता. दरवर्षी प्रमाणं मुलींनी बारावीच्या निकालात बाजी मारली होती. मुलींच्या निकालाची टक्केवारी  ९४.५४ टक्के इतकी होती. तर, मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८९.५१ टक्के इतकी होती. तर कॉपी घडू नये यासाठी अनेक जण लक्ष ठेवून होते, परिक्षा अतिशय चांगल्या पध्दतीने घेण्यात आली एकूण १५ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या परिक्षेदरम्यान १०० कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.